रत्नागिरी दि.19:- कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना शासकीय अर्थसहाय्य मिळणेकामी कलाकारांनी एकल किंवा वैयक्तिक अर्ज जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून दहा दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांसह तालुक्याच्या तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्याबाबत कळविणेत आले होते. सदर अर्ज सादर करण्याची मुदत 18 जानेवारी 2022 रोजी संपुष्टात आली असून रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकारांच्या विनंतीनुसार त्यांना वार्षिक उत्पन्नाचे दाखले मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेवून सदर अर्ज सादर करण्याची मुदत 25 जानेवारी 2022 अखेर वाढविण्यात येत आहे याची नोंद घेण्यात यावी व परिपूर्ण अर्ज तालुक्याच्या तहसिलदारांमार्फत जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांचेकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रत्नागिरी डॉ. बी.एन.पाटील यांनी केले आहे.














