मुंबई, (निसार अली) : मुंबई मध्यवर्ती कारागृह(ऑर्थर रोड) कारागृहातील कैद्यांना वायरमन बनण्याचे प्रशिक्षण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या एका सोहळ्यात हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कैद्यांना वायरमन प्रशिक्षण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. मुंबई मध्यवर्ती कारागृह आणि युवा परिवर्तन खेरवाड़ी सोशल वेल्फेअर असोशिएशन यांनी हा कार्यक्रम राबविला आहे.
ऑर्थर रोड कारागृहचे जेल अधीक्षक हर्षद अहिरराव आणि वरिष्ठ तुरुंगाधिकारी एच.एस. मिंड, साहेब अंकुश ढेंगले व युवा परिवर्तनचे ऑपरेशन हेड सुनील नायर आणि समन्वयक धीरज शर्मा, अशोक जगताप आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्यासारख्या आणखी लोकांना एकत्र आणा, त्यातून स्वयंरोजगार निर्माण करून स्वतःचे स्थान निर्माण करा, असे आवाहन अहिरराव यांनी कैद्यांना केले. धीरज शर्मा यांनी युवा परिवर्तनच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मिळालेल्या सहयोगाबद्दल मुंबई मध्यवर्ती कारागृह व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले.