रत्नागिरी, (आरकेजी) : एकमेकांचे राजकीय हाडवैरी असलेले शिवसेनेचे दोन नेते आज एकाच व्यासपीठावर दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दापोली तालुक्यातील दाभोळ गावात नव्याने उभारण्यात आलेल्या आयटीआयचे उद्धघाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केले.
कोकणातील तरूणांना रोजगारभीमुख प्रशिक्षण मिळावे यासाठी या आयटीआयची निर्मिती करण्यात आली आहे. रामदास कदम आणि अनंत गीते यांच्यात मध्यंतरीच्या काही काळात विस्तवही जात नव्हता. या दोघां मधील मतभेद एकदम टोकाला गेले होते, मात्र दरम्यानच्या काळात एकत्र येत ते मतभेद विसरले आहेत. आपल्या भाषणामध्ये पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आम्ही एकत्र आलो ते केवळ काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यामुळे असे सांगताच हशा पिकला. या कार्यक्रमात जगतापही उपस्थित होते.