नवी दिल्ली : ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा झाली. सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय ‘धप्पा’, ‘म्होरक्या’, ‘पावसाचा निबंध’ आणि ‘मयत’ हे मराठी चित्रपट विविध श्रेणींमध्ये सर्वोत्तम ठरले आहेत. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार तर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.