
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या वतीने होणारा राज्यस्तरीय क्रीडा महोत्सव संस्थेच्या क्रीडासंकुलात सुरु आहे. कबड्डी विभागात १८ वर्षे वयोगटातील रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात चिपळूण येथील न्यू हिंद विजय संघाने देवरूखच्या युवराज स्पोर्ट्स क्लब संघाचा १५-१३ ने पराभव करीत अजिंक्यपद मिळविले. भूषण मुठेकरने केलेल्या नेत्रदीपक पकडीत व त्याला इतर खेळाडूंची लाभलेली साथ हे सामन्याचे वैशिष्ट्य ठरले. देवरूखच्या प्रसाद धामणेच्या पल्लेदार चढाया मात्र त्याच्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.
कबड्डी, मुलींमध्ये वेताळबाबा कला क्रीडा मंडळ, कोकरूड या संघाने १२ गुण मिळवीत प्रथम क्रमांक तर राजश्री शाहू विद्या निकेतन, शिंगणापूर संघाने ८ गुण मिळवीत दुसरा क्रमांक मिळविला. प्रीती शिंदेने उत्कृष्ट चढाईचे तर पकडीचे बक्षीस नेहा कुंभारने पटकाविले.
दरम्यान १४ वर्षाखालील वयोगटात मुलींमध्ये गगनभरारी स्पोर्ट्स क्लब,कोल्हापूर विजेता तर निलेश्वर स्पोर्ट्स क्लब, कऱ्हाड उपविजेता ठरला. धनश्री लेले व साक्षी पवार यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचे बक्षीस मिळाले. मुलांमध्ये ए के ग्रुप, रायगड विजेता तर संस्कारधाम विद्यालय, महाड उपविजेता ठरला. विशाल यादव व कौशल बारटक्के यांना उत्कृष्ट चढाई व पकडीच्या बक्षिसाने गौरविण्यात आले.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडासंकुलात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही खो खो,कबड्डी, फुटबॉल, लंगडी,बुद्
राज्यभरातील विविध शाळा,कॉलेज, क्लब, संघटना यामधील ४ हजाराहून अधिक खेळाडू यात सहभागी झाले आहेत. राज्यातून तसेच थेट गुजरातमधूनही संघ या महोत्सवामध्ये हजेरी लावत आहेत.















