![](http://www.konkanvruttaseva.com/wp-content/uploads/2017/06/mati-164x300.jpg)
आज दुपारी हा प्रकार घडला. बांधकाम व्यावसायिक चव्हाण यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला, असा आरोप सुशिला अपार्टमेंटमधील राहिवाशांनी केला आहे.
उदयनगर येथे विकासक चव्हाण डोंगराचा काही भाग पोखरून संरक्षक भींत बांधत होता. स्थानिकांनी महसूल विभागाकडे या विरोधात तक्रारही केली होती. डोंगर पोखरल्यास आजुबाजुच्या घरांना धोका निर्माण होईल, अशी तक्रार केली गेली होती.
महसूल विभागाने पाहणी करून उत्खनन थांबण्याचे आदेशही दिले होते. विकासकाने उत्खनन थांबवले नाही. आज दुपारी एकच्या सुमारास या ठिकाणी संरक्षक भिंतीचं काम सुरू होते. याच सुमारास मातीचा मोठा ढिगारा खाली कोसळला. काम करणारे दोन्ही कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले.