विजयदुर्ग : क्षा. म. समाज, मुंबई या संस्थेतर्फे विजयदुर्ग विभागात ग्रामीण कर्जाऊ शिष्यवृत्ती वाटप ३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. क्षा. म. स. खजिनदार अरुण रावले यांनी शिष्यवृत्ती वाटप दरम्यान क्षा. म. स. आराध्यदैवत डॉ. शिरोडकर यांच्या खडतर जीवनाबद्दल व समाजाप्रती योगदानाबद्दल मार्गदर्शन केले व मुलांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
विजयदुर्ग विभागात ग्रामीण शिष्यवृत्ती वाटपासाठी सुनील घारकर, शरद घाटये , प्रदीप घाटये, विलास फणसेकर (नाटे), मनोहर कांबळी (कुवेशी), प्रमोद गावकर, संतोष गावकर, प्रवीण गावकर, पंकज गुरव (अणसुरे), वामन गावकर, सुदर्शन गावकर (सागवे ), दीपक (बंड्या) गावकर , संजय कुवेसकर, महेंद्र गावकर, रामा पडेलकर (फणसे ) यांनी सहकार्य केले.