मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) – ज्येष्ठ पत्रकार नितीन चव्हाण यांचे आज मध्यरात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास विक्रोळी (पश्चिम) येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी नितीन चव्हाण यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करीत आदरांजली वाहिली.
नितीन चव्हाण गेले काही महिने फुफ्फुसाच्या संसर्गाने आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही केले जात होते. मात्र काल रात्री साडे तीन वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी त्यांचे दुखद निधन झाले. विक्रोळी (पूर्व) टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नितीन चव्हाण दीर्घ आजारातून बरे व्हावेत यासाठी सर्व पत्रकार, दानशूर व्यक्ती, महापालिकेचे काही अधिकारी वर्ग, मित्र परिवार आदींनी शक्य होईल त्या सर्व प्रकारे प्रयत्न केले. मात्र ते प्रयत्न नियतीसमोर अपुरे पडले. ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांचे प्रतिनिधी म्हणुन प्रसिध्दी प्रमुख सुरेश नंदिरे तसेच महापालिकेचे माजी जनसंपर्क अधिकारी विजय खबाले-पाटील यांनी त्यांना टागोर नगर येथील स्मशानभुमीत उपस्थित राहून श्रध्दांजली वाहिली.