
रत्नागिरी : राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जुवे, ता.जि. रत्नागिरी येथे बंधाराची पाहणी केली. यावेळी बंदर अधिकारी संजय उगलमुगले, मेरीटाईम बोर्डचे मंजुळे, सुधीर चव्हाण, नाना शिंदे, सचीन वहाळकर, सतीश शिंगडे आदि मान्यवर तसेच जुवे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी येथील ग्रामस्थ सुधीर चव्हाण यांनी मागणी केलेल्या जुवे येथे पर्यटन वाढीच्या दृष्टिने घाटाची निर्मिती, बंधाऱ्याची निर्मिती, डोंगरावरील रस्ता डांबरीकरण आदि मागण्यांबाबत बोलताना चव्हाण म्हणाले बंधारा तसेच इतर विकासात्मक गोष्टी पूर्णत्वास नेण्यास आपण कटिबध्द असून त्यासाठी आपण प्रमाणिकपणे प्रयत्न करु. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून येथील युवकांनी मत्सशेतीसारखे व्यवसायही करणे गरजेच आहे, त्यासाठी आवश्यक ती मदत आपण करु असेही त्यांनी यावेळी येथील जनतेला आश्वासीत केले.
त्यांनतर मांडवी, रत्नागिरी येथे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी चंवडे वठार ते मांडवी दरम्यान पाच रॅम्प बांधणेचे भूमिपुजनही केले.















