
यावेळी राणे म्हणाले की, केंद्रीय मंत्र्याला अटक करून काय पराक्रम केला. दरोडेखोरांना अटक करावी तशी मला अटक केली. दादागिरी करू नका वाट्याला जाऊ नका, मी टप्प्याटप्प्याने प्रकरण बाहेर काढणार आहे. असा सूचक इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
घरात बसून आम्हाला कारभार करायचा नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
गेल्या दोन दिवसात काय प्रकार झाला आहे तुम्ही पाहताय, सहा सात -तास लोकं रस्त्यावरती थांबली हे यांच्या नशिबात नाही. पूर्वी घडलेल्या घटनेवरती पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मी बोललो. दोन-अडीचशे पोलीस फौज घेऊन केंद्रीय मंत्र्याला अटक केली. काय पराक्रम केला. महाराष्ट्राची जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये लोक मरण पावत असतील तर, यांना पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.