
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांतील राखीव साठय़ातून आता पाणीपुरवठा केला जात आहे. सदर पाणीपुरवठय़ाद्वारे मुंबईवासियांना जुलैअखेर सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल, असे पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.
यावर्षीचा पावसाळा मुंबईत व तलाव क्षेत्रांत अजुनही मोठय़ा प्रमाणात सुरु झाला नसल्याने तलावात पाणीसाठा जमा होत नाही. महापालिकेने जरी जुलैअखेर पाणी पुरविण्याचे नियोजन केले असले तरी, मुंबईकर नागरिकांनी पाणी जपून वापरावे, तसेच साठविलेले पाणी टाकून न देता त्याचा इतर उपयोगासाठी वापर करावा,असे आवाहन पालिका प्रशासनाने मुंबईवासियांना केले आहे.














