रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): जेएसडब्ल्यू समुह प्रयोजित,रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार ४ फेब्रुवारी रोजी जेएसडब्ल्यू कोकण किनारा हाफ मॅरेथॉन आणि क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एकूण तीन लाख रुपयांची रोख बक्षिसे धावपटूंसाठी ठेवण्यात आली असल्याची माहिती जेएसडब्ल्यू एनर्जीचे उपाध्यक्ष यतिश छाब्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोकण किनारा क्रॉसकंट्री स्पर्धेच्या अयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला जेएसडब्ल्यू समुहाचे यतिश छाब्रा, एचआर हेड विजय वाघमारे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, अथलेटिक्स असोसिएशनचे सरचिटणीस संदीप तावडे उपस्थित होते. स्पर्धा रविवार ४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. स्पर्धेसाठी ११ गट करण्यात आले आहेत. यामध्ये पुरुष व महिलांसाठी (२१ कि.मी.), महिला खुला गट, १७ वर्षाखालील मुलगे, मुली (६ कि.मी.), १४ वर्षाखालील मुले‚मुली व महीला व पुरुषांसाठी ड्रीम रन (३. कि मी.) यांचा समावेश आहे. प्रवेश अर्ज दि.२८ जानेवारीपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. गतवर्षी या स्पर्धेला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतीसाद मिळाला होता. एकूण १४१३ धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विशेष म्हणजे अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत १३८७ जणांनी ही स्पर्धा पुर्ण केली होती. यावर्षी क्रॉसकंट्रीसह हाफ मॅरेथॉन (२१ कि.मी.) चा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धा संपुर्ण कोकणासाठी खुली ठेवण्यात आली आहे. हाफ मॅरेथॉनसाठी गणपतीपुळे ते जय गणेश मंदिर, जयगड असे २१ कि.मी.अंतर असून सहा कि.मी. अंतराची स्पर्धा जेएसडब्लू मँगो गार्डन गेट, उंडी ते जय गणेश मंदिर, जयगड असा मार्ग ठेवण्यात आले आहे. तीन कि.मी.ची स्पर्धा जेएसडब्लु जय गणेश विनायक मंदिर येथून प्ररंभ होणार आहे. हाफ मॅरेथॉनसाठी पहिल्या पाच स्पर्धकाना अनुक्रमे रुपये ३१ हजार, २१ हजार,१५ हजार, १ हजार,१ हजार अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहा कि.मी.अंतरासाठी पहिल्या पाच स्पर्धकांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार, १ हजार,१ हजार अशी बक्षिसे असुन ३ कि.मी. अंतरासाठी ३ हजार, २ हजार, १ हजार, ५०० रु , ५०० रु .अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या व्यतीरीक्त प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना मेडल, प्राविण्य प्रमाणपत्र व सहभागी होणार्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा बक्षिस समारंभ लगेचच जय गणेश मंदिर, जयगड येथे होणार असून स्पर्धकांसाठी जेएसडब्ल्यू समुहातर्फे जय गणेश मंदीर,जयगड येथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे तालुक्याबाहेरील खेळाडूंची स्पर्धेच्या आदल्या दिवशीची निवास व्यवस्था जयगड येथे करण्यात येणार असून स्पर्धेच्या दिवशी सकाळी ७ वाजता जयस्तंभ, रत्नागिरी येथून स्पर्धकांना नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेश अर्ज जिल्हा क्रीडा कार्यालय मारुती मंदीर, रत्नागिरी येथे उपलब्ध असून दि. २८ जानेवारी पर्यंत स्विकारण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संदीप तावडे (९४२२४३०७९९),नरेंद्र देसाई (९५५२५७७३९९), विक्रम खातु (९९०४०११९९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जेएसडब्ल्यू समूह,रत्नागिरी जिल्हा पोलीस आणि रत्नागिरी जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने करण्यात आले आहे.