मुंबई : एलआयसीसाठी १ जून ते १५ जून या काळात प्रतिनिधी जॉय झेवियर यांनी प्रभावी कामगिरी केली. त्यामुळे झेवियर यांचा एलआयसी भांडूप विभाग पश्चिम विभागीय क्षेत्राकडून चॅम्पियन ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
दरवर्षी १ जून ते १५ जून या काळात एलआयसीसाठी कार्य करणार्या प्रतिनिधींकडून कमी प्रमाणात व्यवसाय होतो. यामुळे या काळात जास्त बिझनेस आणणार्या प्रतिनिधीला चॅम्पियन ट्रॉफी देण्यात येते, यावेळी जॉय झेवियरयांनी ही ट्रॉफी पटकावली आहे,
भांडूप विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शशिकांत गायकवाड, सागर देवार्डेकर, मानसी गंधे, प्रगती पोतदार आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते,
एलआयसी विभागीय ट्रेनिंग विभागाचे मार्गदर्शन मिळाल्याने या काळात व्यवसाय करू शकलो, असे जॉय झेवियर यांनी सांगितले.