मुंबई, (निसार अली) : मालाडमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची माय अशी ओळख असणार्या जोहना बुथेलो यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज निधन झाल. त्यांच्या निधनाने त्या चालवत असलेल्या बुथेलो आश्रमातील ६६ जण पुन्हा अनाथ झाले आहेत. त्यांची माय या जगातून निघून गेली आहे.
मढ चर्च जवळ बुथेलो यांचा आश्रम होता. ६६ अनाथ मूल-मुली तेथे आश्रय घेत आहेत. जी पहिल्यापासूनच अनाथ आहे. आईच्या मायेने बुथेलो बुथेलो संगोपन करत होत्या. त्यांच्या निधनानंतर मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.