मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी पूर्वेतील बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखालील मोठ्या नाल्यावर असलेला पादचारी पुल आज सकाळी सात वाजता खचला. फ्रान्सीसवाडी येथे हा पुल आहे. अता हा पुल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.
या घटनेत भीमसिंग केबावी हे सकाळी कुत्र्याला फिरवण्यासाठी या पुलावरुन जात होत होते. याचवेळी पुल खचल्याने त्यांच्या पाठीवर आणि पायाला दुखापत झाली आहे. ट्रॉमा केअर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे.
या पादचारी पुलावरुन जोगेश्वरी रेल्वे स्टेशनकड़े सकाळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक कामावर जातात. मेघवाड़ी, प्रतापनगर, फ्रान्सीसवाडी येथील नागरिक ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर करत होते. पुल अतिशय जुना असल्याने कमकूवत झाला होता. पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते.