उरण : जेएनपीटीमधल्या शेवा येथे एका खासगी टर्मिनल ऑपरेटर कंपनीचे काम विस्कळीत झाले आहे. सायबर हल्ल्यामुळे जगात अनेक ठिकाणच्या कामात खंड निर्माण झाला असून त्याचाच हा परिणाम असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. मालवाहतुकीमधील संभाव्य अडथळा लक्षात घेऊन कंपनीने उपाय योजले आहेत.
नौवहन मंत्रालय आणि जेएनपीटीचे परिस्थितीवर लक्ष असून व्यापारातले अडथळे कमीत कमी राहावेत यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. वाहतूकदार आणि विशेषत: स्थानिक नागरिकांना या परिस्थितीचा त्रास होऊ नये यासाठी काळजी घेतली जात आहे. संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या खासगी कंपनीच्या मालवाहू वाहनांसाठी जेएनपीटीने पार्किंग उपलब्ध करून दिले आहे. वाहतूक नियंत्रण पथके तैनात करण्यात आली असून पार्किंगसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याकरता जेएनपीटी सिडकोबरोबर काम करत आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सायबर सुरक्षा समन्वयक डॉ. गुलशन राय जेएनपीटीला भेट देणार आहेत