नवी दिल्ली : जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट या देशातल्या अग्रेसर कंटेनर गौदीने आपल्या शिरपेचात मानाचा आणखी तुरा रोवला असून, चौथ्या भारतीय सागरी पुरस्कार 2019 मधे गोदीने सर्वोत्तम बंदर पुरस्कार मिळवला आहे. सागरी क्षेत्रातल्या तीस वर्षाच्या गौरवशाली सेवेबद्दल जेएनपीटीचा विशेष गौरव करण्यात आला.
बंदरातून होणारी मालाची उलाढाल, वृद्धी, विस्तार आराखडा, नवे उपक्रम, ई-व्यापार, ग्राहक संतोष यासारख्या विविध निकषांच्या आधारे सर्वोत्तम बंदराची निवड केली जाते.