मुंबई, दि. 10 : राज्यातील डॉक्टर, परिचारिका यांच्याबरोबरच आरोग्य कर्मचारी, कोविडकाळात आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि साठ वर्षे वयावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येत आहे. सकाळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत जे.जे. रुग्णालयात या प्रतिबंधात्मक मात्रा देण्याच्या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जे.जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, लसीकरण प्रमुख डॉ.ललित संखे यांच्यासह डॉक्टर आणि जे.जे. रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाल्यानंतर प्रतिबंधात्मक मात्रा मिळणार आहे. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांच्यासह आरोग्य कर्मचारी याबरोबरच 60 वर्षावरील सहव्याधीग्रस्त यांना प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येणार आहे.