मुंबई : विक्रोळी पोलिस ठाणे व दिशा वेल्फेअर ग्रुप आयोजित युनायटेड वे सामाजिक संस्थेतर्फे दि.१५ डिसेंबर रोजी स्वागत पार्क ,कन्नमवार नगर २ येथे सकाळी १०.३० ते २.३० वा.रस्ते अपघात सुरक्षा अंतर्गत जीवन दूत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत प्रात्यक्षिकांसहित प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा ग्रुपचे अध्यक्ष दिनेश बैरिशेट्टी यांनी केले. रश्मी पहुडकर, कृष्णा काजरोळकर,दिशा ग्रुपचे सचिव प्रकाश पालव व सभासद या कार्यशाळेत सहभागी झाले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा चव्हाण तसेच अधिकारी व सहकारी उपस्थित होते. पूजा दळवी, अध्यक्षा सक्षम महिला मंडळ, केतकी सांगळे,विक्रोळी विधान सभा महिला महामंत्री भाजप, रश्मी पहुडकर, शिवसेना इ. मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र,ओळखपत्र, रू.१५००/- किंमतीचे मेडिकल कीट वाटप करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.