
Mumbai : दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी जीवनदायी भवन वरळी मुंबई ईथे रुग्ण मित्रांची बैठक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे प्रमुख अधिकारी महाराष्ट्र शासन डॉ सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली.या वेळी शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे ही योजना कशी सुरू आहे या विषयी मार्गदर्शन केले. मुंबई, पुणे, अहमदनगर इथून रुग्ण मित्र तसेच डॉक्टर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वांनी या योजने संबंधी आपापले मुद्दे मांडले.सर्वांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर शिंदे यांनी दिले. या नंतर तिथे असलेले रुग्णालय आणि कॉल सेंटरची पाहणी केली. बैठकीचे आयोजन प्रसन्न फाउंडेशनच्या प्रमुख श्रध्दा आष्टिवकर, विनोद साडविलकर , ज्येष्ठ समाज सेवक धनंजय पवार यांनी केले.
दिशा वेलफर ग्रुप चे अध्यक्ष व मुंबई सिटीझन फोरम चे पूर्व प्रदेश अध्यक्ष दिनेश बैरीशेट्टी ,दिशा वेलफर ग्रुप व मुंबई सिटीझन फोरम चे वाॅड प्रतिनिधी नवीनकुमार पांचाल, मधु तारा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष नितीन शिंदे बरोबर राज्यातून आलेले इतर सामाजिक संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी सर्वांनीच एकमेकांच्या संपर्कात राहून सोबत कार्य करून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळवून देऊ असे सांगितले.















