मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी एक महिन्याच्या आत जागा निश्चित करावी, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातारा जिल्हाधिकारी यांना दिल्या.
जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यासाठी वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री या समितीचे सहअध्यक्ष आहेत. या समितीची बैठक आज सह्याद्री अतिथीगृहात झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय यांच्यासह पुनर्गठीत समितीचे इतर पदाधिकारी,सातारा जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी ची बैठक घेऊन एक महिन्यात या स्मारकाची जागा निश्चित करावी त्यानंतर स्मारकाचा उत्तम आराखडा तयार करून तो मान्यतेसाठी सादर करावा, त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल,असे वित्तमंत्र्यांनी यावेळी सांगितले.