रत्नागिरी, प्रतिनिधी : तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे टंचाई कमी होईल अशी शक्यता होती; मात्र अजुनही 64 गावातील 106 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. 13 हजार 140 लोकांना हे पाणी पुरवले जात आहे.
गतवर्षी उशिरापर्यंत पाऊस लांबल्यामुळे टंचाईची तिव्रता कमी होती. मार्च महिन्याच्या अखेरीस टँकरने पाणी पुरवठा सुरु झाला. दरवर्षीपेक्षा यंदा उशिरा टँकर धावू लागले. उन्हाचा कडाका वाढल्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस टँकरग्रस्त गावांची संख्या वाढू लागली. 16 मे रोजी तौक्ते चक्रीवादळामुळे पाऊस झाल्यानंतर टँकरग्रस्त वाड्यांची संख्या जैसे थे राहील. यावर्षी बहूतांश टंचाईग्रस्त वाड्या या एका बाजूला डोंगराळ भागात वसलेल्या आहेत. गेल्या दोन दिवसात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस झालाच तर टँकरची संख्या कमी होईल. सध्या दापोली, गुहागर तालुका वगळता अन्य सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.