रत्नागिरी, 10 जून : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील विषाणू प्रयोगशाळेत स्वॅब तपासणी सुरु झाली यात एकूण 22 नमुने आज तपासण्यात आले. यात 20 निगेटिव्ह व 2 पॉझिटिव्ह आले आहेत.
आज तपासलेल्या नमुन्यांपैकी 10 रत्नागिरीचे होते त्यापैकी 9 निगेटिव्ह आले तर एक पॉझिटिव्ह आला आहे. लांजा येथील 12 नमुन्यांपैकी 11 निगेटिव्ह आले असून एक पॉझिटिव्ह आहे.
ही लॅब कार्यान्वित झाली आहे सध्या आर एन एक्ट्रॅक्शन प्रक्रियेत तंत्रज्ञांचा सहभाग आहे. तथापि याला पूर्णपणे मानवविरहीत करण्याची सूचना मुख्यमंत्री महोदयांनी काल केली होती त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असून यासाठी 15 लाख रुपयांची अधिकची रक्कम देण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल सायंकाळी केली होती. याबाबत यंत्र खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.