मुंबई : जिल्हा परिषदेच्या मालकीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना सुधारीत करण्यासाठीचा ठराव प्राप्त झाल्यास त्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यास प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत दिली.
देवगड तालुक्यातील देवगड-गढीताम्हाणे रस्त्याच्या समस्येसंदर्भात सदस्य नितेश राणे यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यास उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या.
मुंडे म्हणाल्या, जिल्हा परिषद अखत्यारित जे रस्ते आहेत त्यांच्या अपग्रेडेशचा प्रस्ताव दिल्यास शासन सकारात्मक निर्णय घेईल. देवगड येथील जिल्हा मार्ग क्र. १५ ची प्रत्यक्ष लांबी २६ कि.मी. आहे. सदर रस्ता नगर पंचायत देवगड जामसंडे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला असून, त्यातला काही भाग हा खाजगी शेतकऱ्यांचा असल्याने त्यांनी तो दिल्यास नगरविकास विभागाकडून हस्तांतरीत करण्यात येईल आणि नगरपंचायतीस हस्तांतरीत करण्यात येईल. अशी माहिती श्रीमती मुंडे यांनी दिली.
यावेळी सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, बच्चु कडू यांनी उपप्रश्न उपस्थित केला.