रत्नागिरी : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी ते कोंडमाळा-सावर्डे पर्यंतच्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता पी.पी. बनगोसावी, उपअभियंता मिलींद्र मडवईकर, तहसिलदार संगमेश्वर यांच्यासह महामार्गावरील रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवणारे खात्याच्या कन्सल्टंटसह पहाणी केली.
जिल्हाधिकारी म्हणाले 13 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रांरभ होत आहे. त्यामुळे आठवडाभर अगोदरपासून या मार्गावर चाकरमान्याच्या वाहनांची आणि एसटीची जोरदार वाहतूक सुरु होणार आहे. त्यांना महामार्गावरील खड्यांचा त्रास होऊ नये यासाठी तात्काळ रस्त्यावरील खड्डे भरा. आवश्यकता असल्यास काम करणारे कामगार वाढवा, खड्डे जास्त कोठे आहेत ते पहा आणि त्यानुसार तात्काळ खड्डे भरा अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी संबधितांना दिल्या.