मुंबई : जेट एअरवेज या विमानसेवा कंपनीला भारताची सर्वोत्तम विमानकंपनी या ट्रीप अॅडव्हायजरच्या ’ट्रॅव्हलर्स चॉईस’ पुरस्काराने गौरविण्यात आले. ट्रीप अॅडव्हायजरवर प्रवाशांनी फेब्रुवारी २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत प्रवाशांनी विमानकंपनीबाबत दिलेल्या प्रतिक्रियांवरून हा पुरस्कार देण्यात आला आहे.
ट्रीप अॅडव्हायजर ही जगातील सर्वात मोठी पर्यटनासाठीची साईट असून, ती महत्त्वाची माहिती आणि जगभर फिरणाऱ्या लाखो प्रवाशांनी आपल्या अनुभवातून दिलेल्या प्रतिक्रिया येथे देते आणि याच्या साहाय्याने आपण ठिकाणे आणि तेथील राहण्याची सोय यांची निवड करू शकतो. विविध प्रकारांसाठीचा हा वार्षिक ट्रॅव्हलर्स चॉईस पुरस्कार केवळ प्रवासी आणि व्यापारी उद्योगक्षेत्रासाठी दिला जातो. वेबसाईटतर्फे यंदा विमानकंपन्या प्रकाराचाही पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आणि विमानकंपन्यांनी दिलेल्या सेवा आणि त्यांचा दर्जा याबाबत जगभरातील प्रवाशांच्या अनुभवातून आलेले १२ महिन्यांच्या कालावधीतील रिव्ह्यू याद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. कंपन्यांची सर्वोत्तम सेवा, दर्जा आणि पाहुण्यांना अतिरिक्त मूल्याधिष्ठित सेवा देणे यावरून ट्रॅव्हलर्स चॉईस हा पुरस्कार कंपनीला प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबाबत जेट एअरवेजचे प्रमुख व्यावसायिक अधिकारी जयराज षण्मुगम म्हणाले की, “प्रवासादरम्यान आनंददायक, उत्तम जोडणी, पर्याय, सुलभता आणि आरामदायीपणा आदी निकषांवर सेवा देण्याच्या आमच्या तत्त्वज्ञानाला पर्यटकांनी दिलेली ही पोचपावती आहे. ”
ट्रीप अॅडव्हायजर इंडियाचे व्यवस्थापक निखिल गंजू म्हणाले की, “भारतीय बाजारपेठेत प्रवाशांसाठी विविध विमानकंपन्या कार्यरत आहेत, आणि सातत्याने नवीन कंपन्या बाजारपेठेत दाखल होत आहेत. आम्हाला खात्री आहे, की या पुरस्कारामुळे भारतीय प्रवाशांना विमान प्रवासाच्या निर्णयाबाबत अधिक चांगली माहिती उपलब्ध होऊ शकेल, इतकेच नाही तर विमान कंपन्यांनाही त्यांच्या प्रवाशांना नेमके काय हवे आहे ते कळू शकेल.”