मुंबई : जेट एअरवेज या आंतरराष्ट्रीय विमान कंपनीने भारतातून युरोपला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अॅमस्टरडॅम व पॅरिससाठीच्या विमानसेवेसाठी विशेष भाड्याची घोषणा केली. सप्टेंबर 15, 2017 रोजीच्या प्रवासासाठी लागू असलेल्या या विशेष ऑफरनुसार, प्रवाशांना भारतातील सर्व ठिकाणांहून अॅमस्टरडॅम व पॅरिसला जाण्यासाठी वन-स्टॉप ‘फ्लॅट’ रिटर्न प्रवासाचे विशेष भाडे इकॉनॉमीसाठी 39,990 रुपये वप्रीमिअर प्रवासासाठी 99,990 रुपये भाडे आकारले जाणार आहे.
ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. कंपनीच्या ऑक्टोबर 29, 2017 पासून, चेन्नई – पॅरिस (9W 128), बेंगळुरू – अॅमस्टरडॅम (9W 236) आणिमुंबई – लंडन हिथ्रो (9W 116) या दरम्यान सुरू होणार असलेल्या नव्या व आगामी नॉन-स्टॉप सेवांसाठी लागू असणार आहे.
कंपनीच्या देशांतर्गत जाळ्यातून कोठूनही सुरू होणाऱ्या विमानसेवेसाठी एकच भाडे आकारले जाणार असल्याने भारतातील उदयोन्मुख शहरांना युरोपशी जोडण्यासाठी मदत होणार आहे. विशेष भाडे असलेल्या तिकिटांची विक्री तातडीने सुरू होणार असून ती ऑगस्ट 10, 2017 पर्यंत सुरूराहणार आहे.
देशभरातील सर्व प्रवाशांना विमानसेवा सुरू होण्याचे ठिकाण कोणतेही असले तरी निश्चित स्वरूपाचे भाडे भरून आता कंपनीच्या देशांतर्गत जाळ्यातील कोणत्याही ठिकाणावरून मुंबई, दिल्ली, बेंगळुरू व चेन्नईमार्गे अॅमस्टरडॅम-पॅरिसला जाता येणार आहे. म्हणजेच, अमृतसर ते अॅमस्टरडॅम हा प्रवास पुणे ते पॅरिस यासारखाच असणार आहे.