
मुंबई : आंतरराष्ट्रीय मार्गांवर संपूर्ण सेवा देणाऱ्या जेट एअरवेज या भारतातील एअरलाईन कंपनीने सहा दिवसांची एक खास जागतिक सवलत ‘योजना आयोजित केली आहे. दि. 4 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या योजनेत प्रवाशांना जेटच्या व सहयोगी कंपन्यांच्या जगातील कोणत्याही मार्गावर इकॉनॉमी व प्रीमिअर श्रेणीच्या भाड्यामध्ये 30 टक्क्यांपर्यंतची सवलत घेता येणार आहे. एकेरी (सिंगल) आणि परतीच्या (रिटर्न) या दोन्ही स्वरुपाच्या तिकीटांवर या ‘सेल’च्याकाळात ही सवलत मिळेल, असे ‘जेट’ने घोषित केले आहे.
तिकीट बुकिंगच्या सर्व माध्यमांमधून सुमारे 25 लाख सीट्सवर ही 30 टक्क्यांची सवलत येत्या दि. 7 सप्टेंबरपर्यंत प्रवाशांना घेता येईल. ‘जेट एअरवेज डॉट कॉम’ आणिएअरलाईनच्या ‘मोबाईल अॅप’मधून बुकिंग करणाऱ्यांना ही सवलत रविवार, दि. 9 सप्टेंबरपर्यंत मिळू शकेल. ही जागतिक स्वरुपाची सवलत योजना एकेरी व परतीच्याप्रवासासाठी, तसेच प्रीमिअर व इकॉनॉमी श्रेणीसाठी मिळणार आहे.
भारतामधून तिकीटाचे बुकींग करणाऱ्यांना ‘एअरलाईन’च्या देशांतर्गत व परदेशातील 66 पैकी कोणत्याही मार्गावर सवलत मिळेल. आखाती देशांतील शहरांमधून तिकीटघेणाऱ्यांना भारत, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका व अति पूर्वेकडील देशांमध्ये जाण्यासाठी सवलत मिळू शकेल. नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अति पूर्व येथील प्रवासी ‘जेट एअरलाईन’च्या कोणत्याही मार्गावरील तिकीटांवर सवलत मिळवू शकतील. त्यांना केवळ टोरंटोला सवलतीतजाता येणार नाही. टोरंटो येथून तिकीट घेणाऱ्यांना अॅमस्टरडॅम आणि भारतातील कोणतेही शहर येथे ही सवलत ‘जेट एअरवेज’च्या मार्गावर मिळेल.
‘जेट एअरवेज’च्या जागतिक विक्री व वितरण विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राज शिवकुमार यांनी सांगितले, की जगभरातील एवढ्या विविध ठिकाणी आकर्षकसवलतींच्या दरात जाण्याची संधी प्रवाशांना या योजनेतून मिळेलच, त्याशिवाय त्यांच्या पैशांचीही मोठी बचत होईल. जेट एअरवेजच्या एकमेवाद्वितीय अशा नेटवर्कचाव कनेक्टिव्हिटीचा, तसेच जागतिक दर्जाच्या सेवेचा अनुभवही प्रवाशांना मिळेल. अविस्मरणीय पर्यटनाचा आनंद प्रवाशांना मिळेल, अशीच ठिकाणे ‘जेट एअरवेज’ने निवडली आहेत.














