मुंबई:जेट एयरवेज या भारतातील उच्चभ्रू आंतरराष्ट्रीय एयरलाइन कंपनीला काल बोईंगकडून ७३७ मॅक्स विमान मिळाले. यामुळे कंपनी हे नवीन आणि अत्याधुनिक विमान वापरणारी पहिली कंपनीठरली आहे. हे विमान दोन आकडी इंधनक्षमता आणि ग्राहकांसाठी अधिक चांगला आरामदायीपणा पुरवणारे आहे.नवे ७३७ मॅक्स भविष्यातील आमच्या विकास धोरणासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे नवे विमान ग्राहकांना उपलब्ध करून देणारे भारतातील आम्ही पहिलेच आहोत, असे जेट एयरवेजचे अध्यक्ष, नरेश गोयलम्हणाले. ‘गेल्या कित्येक वर्षांपासून ७३७ आमच्या ताफ्याचा कणा ठरलेले असून नव्या ७३७ मॅक्समुळे त्फ्यात आणखी चांगल्या क्षमतेचा समावेश करताना आम्हाला आनंद होत आहे. सुधारित अर्थकारण आणिइंधनक्षमता तसेच ग्राहकांसाठीचा आरामदायीपणा ही मॅक्सची वैशिष्ट्ये भारतातील उच्चभ्रू एयरलाइन्सचे आमचे स्थान अधिक बळकट करतील.’जेट एयरवेज ही भारतातील दुसरी सर्वात मोठी विमानकंपनी असून तिच्या ताफ्यात आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि इतरत्र ठिकाणच्या १५ देशांतील ६५ देशांना सेवा देणाऱ्या ११९ विमानांचा समावेश आहे. यातजेट एयरवेजने बोईंगला दिलेल्या पहिल्या १५० ७३७ मॅक्स विमानांचा तसेच २०१५ च्या सुरुवातीला ७५ जेट्सच्या दोन स्वतंत्र कंत्रांटाचा आणि या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या कंत्राटाचा समावेश आहे.जेट एयरवेज ही भारतातील आघाडीची आंतरराष्ट्रीय विमान सेवा आहे, जी भारत व परदेशातील ६५ ठिकाणी विमानसेवा देते. जेट एयरवेजचे मजबूत नेटवर्क भारतात सर्वत्र पसरले असून त्याअंतर्गत महानगरे, राज्यांचीराजधानी शहरे आणि उदयोन्मुख ठिकाणे यांचा समावेश आहे. भारताशिवाय जेट एयरवेज महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय ठिकाणीही सेवा देते. त्यामध्ये दक्षिण पूर्व आशिया, दक्षिण आशिया, मध्य पूर्व, युरोप आणि उत्तरअमेरिका यांचा समावेश आहे. जेट एयरवेज समूह सध्या ११९ विमानांचा ताफा हाताळत असून त्यात बोईंग ७७७-३०० ईआरएस, एयरबस ए३३०-२००/३००, आधुनिक बोईंग ७३७ आणि एटीआर ७२- ५००/६०० यांचा समावेश आहे.