मुंबई : जेट एअरवेज या आंतरराष्ट्रीय विमानकंपनीने किफायतशीर सहलींची पॅकेजेस जाहीर केली आहेत. भारतातल्या भारतात प्रती व्यक्ती चौदा हजार ८२० रुपयांपासून जेटएस्केप हॉलिडेजने जेट एअरवेजबरोबर सहलींची पॅकेजेस सादर केली आहेत. ज्यात जेट एअरवेजच्या इकॉनॉमीच्या परतीच्या प्रवासाची (सर्व करांसहित) तिकिटेही समाविष्ट असणार आहेत. विमानतळावरील हस्तांतरण, तीन तारांकित हॉटेलमधील वास्तव्य, नाश्ता आणि पर्यटनस्थळदर्शन अशा सेवांचाही यात समावेश आहे. तर आंतराष्ट्रीय सहली २७,७७० रुपयांपासून असणार आहेत.
जेट एअरवेजचे वरिष्ठ अधिकारी जयराज षण्मुगम् म्हणाले की, “आनंददायी अशा विशेष क्षणांचा अनुभव देण्यासाठी वैयक्तिक आवडीनुसार पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत. ६५ स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणांच्या विस्तारीत नेटवर्कच्या साहाय्याने आम्ही ही सेवा देऊ शकतो.’’
पॅकेजांच्या ऑफरचा भाग म्हणून, मोठ्या वीकेण्डसाठी तीन रात्री-चार दिवसांच्या `ऑलवेज आग्रा’ पॅकेज देण्यात आले आहे. यात प्रामुख्याने ताज महाल आणि अकबर राजाच्या सत्तेची राजधानी फतेपूर सिक्री आदी पाहता येतील.
बॅकवॉटर्स आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घ्यायचाय त्यांना केरळ हा उत्तम पर्याय आहे, येथील पारंपरिक आणि लोकनृत्यांचा आस्वाद, आयुर्वेदिक उपचार आणि मसाल्याची खरेदी अशा भरगच्च कार्यक्रमांचे तीन रात्री, चार दिवसांचे कोची-मुन्नार हॉलिडे पॅकेज आहे.
ईशान्य भारतातही फिरण्याचा आनंद घेता येईल, यासाठीच्या `मेसमरायजिंग हॉलिडेज’ पॅकेजात सहा रात्री-सात दिवसांचा समावेश आहे, ही सहल आसम आणि अरुणाचल प्रदेशात असेल. गुवाहाटीपासून सुरू झालेला प्रवास दिरांगवरून होईल,
जेटएस्केप हॉलिडेजमध्ये आंतरराष्ट्रीय सहलींचेही आयोजन कऱण्यात आले आहे, चार रात्री-पाच दिवसाच्या सहलींचा समावेश आहे. थायलंडमधील बँकॉक आणि पट्टाया, दुबई तसेच सिंगापूर या ठिकाणांचा समावेश आहे.
अधीक माहितीसाठी jetescapes.jetairways.com येथे भेट द्या किंवा 1800 209 6101 (toll-free), +91 22 672 47 100 या क्रमांकावर संपर्क साधा किंवा jetescapes@jetairways.com येथे इमेल करा, असे आवाहन करण्यात आले आहे.