जयपूर : कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल्सचे उत्पादन करणाऱ्या जेसीबी इंडिया या भारतातील आघाडीच्या कंपनीने आपल्या सीईव्ही स्टेज फोरची पूर्तता करणाऱ्या व्हील्ड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल्सची पूर्णपणे नवीन श्रेणी बाजारात आणली. ही यंत्रे बाजारात आणल्यामुळे जेसीबी इंडिया ही सीईव्ही स्टेज फोर उत्सर्जन मानकांची पूर्तता करणारी व्हील्ड मशिन्सची संपूर्ण श्रेणी तयार करणारी उद्योगक्षेत्रातील पहिलीच कंपनी ठरली आहे.
या श्रेणीत ३डीएक्स प्लस आणि ४डीएक्स बाको लोडर्स, व्हीएम११७ सॉइल कॉम्पॅक्टर, ५३०-७० आणि ५३०-११० टेलीहॅण्डरल्स यांचा समावेश होतो. या सर्वांची इंजिने नवीन कार्बन उत्सर्जन नियमांची पूर्तता करणारी आहेत. मोठ्या प्रमाणातील मालाची हाताळणी करण्यासाठी तीन नवीन व्हील्ड लोडर्स, ४३३-४, ४३७-४ आणि ४५५-४ ही वाहनेही कंपनीने नवीन इंजिनसह बाजारात आणली आहेत.
जेसीबी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक शेट्टी जयपूरमध्ये आयोजित सोहळ्यात म्हणाले, “शाश्वत वाढ हा कायमच आमच्या कामकाजाचा आधारस्तंभ राहिला आहे. व्हील्ड कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेइकल्ससाठी आलेल्या सीईव्ही स्टेज फोर उत्सर्जन नियमांचे आम्ही स्वागत करतो. ही नवीन श्रेणी आमच्या पर्यावरण व शाश्वततेप्रती असलेल्या दृढ बांधिलकीचे प्रतीक आहे. या यंत्रांचे कार्बन उत्सर्जन कमी आहेच, शिवाय ही यंत्र अधिक इंधन-कार्यक्षम आहेत. त्यामुळे उपकरण बाळगण्याचा एकूण खर्च कमी होतो.”
या यंत्रांमध्ये जेसीबी लाइव्हलिंक म्हणून ओळखले जाणारे जेसीबीचे प्रगत टेलीमॅटिक्स तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हे क्रांतीकारी तंत्रज्ञान यंत्राच्या स्थानासह त्याची कामगिरी, त्याचे कार्यान्वयन व आरोग्याच्या निकषांबाबतही रिअल-टाइम अपडेट्स देते. उपकरणे जिओ-फेन्स्ड, टाइम-फेन्स्ड असू शकतात आणि जीपीएसद्वारे लोकेट केली जाऊ शकतात. आजच्या तारखेपर्यंत सुमारे १,८०,००० लाइव्हलिंक एनेबल्ड जेसीबी यंत्रांची विक्री झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या यंत्रांचा ताफा व्यवस्थापित करण्याच्या पद्धतीत बदल घडून आला आहे.
याशिवाय जेसीबीचे इंटेली-डायग्नोस्टिक तंत्रज्ञान डिजिटल इंटरफेसच्या माध्यमातून अचूकपणे दोष शोधून काढण्यात मदत करते. याशिवाय जेसीबी पार्टस् मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून जेन्युइन पार्टस् (अस्सल सुटे भाग) ऑनलाइन मागवता येऊ शकतात.
दीपक शेट्टी पुढे म्हणाले, “संरचना प्रकल्पांसाठी चोवीस तास काम सुरू ठेवावे लागते आणि अशा परिस्थितीत ग्राहकांना कायम त्यांच्या यंत्रांच्या ताफ्याच्या संपर्कात राहणे किती महत्त्वाचे हे आमच्या लक्षात आले. जेसीबी लाइव्हलिंकमुळे हे शक्य झाले आहे. आमच्या उत्पादनांमधील डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकात्मीकरणासाठी गुंतवणूक केल्यामुळे जेसीबी उत्पादन बाळगण्याचा अनुभव जागतिक दर्जाचा झाला आहे आणि हा अनुभव भविष्यकाळात आणखी चांगला होणार आहे.”
हा सोहळा जयपूर येथील अत्याधुनिक कारखान्यात पार पडला. हा २०१४ मध्ये सुरू झालेला जेसीबीचा भारतातील सर्वांत नवीन उत्पादन कारखाना आहे आणि तेथे बाको लोडर्स, मिनि एक्सकॅव्हेटर्स, स्किड स्टीअर्स, टेलीहॅण्डलर्स आणि नवीन अॅक्सिस श्रेणीतील यंत्रसामुग्रीचे उत्पादन केले जाते.
ते पुढे म्हणाले, “आज लाँच झालेली बहुतेक उत्पादने जेसीबी जयपूरमध्ये उत्पादित केली जाणार आहे. एक तरुण, चैतन्यपूर्ण व स्त्री-पुरुषांसाठी समान असलेला उत्पादन कारखाना सुरू केल्याचा आम्हाला अभिमान आहे. या कारखान्यांतील सर्व कामे खऱ्या अर्थाने जेंडर-न्युट्रल आहेत. सध्या शॉप प्लोअरवरील मनुष्यबळामध्ये सुमारे ३५ टक्के स्त्रिया आहेत. जयपूरमध्ये तयार झालेली ही यंत्रसामुग्री ५५हून अधिक देशांमध्ये निर्यात होणे अपेक्षित आहे. हा कारखाना दमदार शाश्वतता प्रारूपावर आधारित आहे. यामध्ये झिरो डिस्चार्ज तत्त्वाचे पालन होते आणि सौरऊर्जेचा मुबलक वापर केला जातो.”
बीएस3 ते सीईव्ही स्टेज फोर उत्सर्जन मानकांची पूर्तता हे स्थित्यंतर साधण्यासाठी तंत्रज्ञानात मोठे बदल करणे आवश्यक होते आणि जेसीबीने कोविड साथीच्या काळातही यामध्ये गुंतवणूक सुरूच ठेवली. आपल्या प्रोडक्ट सपोर्ट नेटवर्कमध्ये कौशल्यांचा विकास करण्यासाठी कंपनी गेल्या काही महिन्यांपासून अनेकविध कार्यक्रम राबवत आहे आणि ग्राहकांना जागतिक दर्जाचे उत्पादन सहाय्य मिळेल, याची खातरजमा करत आहे. या यंत्रांचे इंजिनीअरिंग भारतात, भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आले आहे. या यंत्रांच्या देशभरात सुमारे १,००,००० तास चाचण्या घेऊन त्यांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
नवीन बाको लोडर श्रेणीमध्ये नवीन ३डीएक्स प्लस, ३डीएक्स सुपर, ३डीएक्स एक्स्ट्रा आणि ४डीएक्स ही व्हर्जन्स असून, अनेकविध उपयोजनांच्या गरजा लक्षात घेऊन ती विकसित करण्यात आली आहेत. या सर्वांमध्ये ३० नवोन्मेषकारी फीचर्स आहेत. नवीन ३डीएक्स प्लस हे वाहन ७ टक्के अधिक इंधन-कार्यक्षम आहे आणि यामध्ये ८ टक्क्यांपर्यंत अधिक खणण्याची शक्ती असल्याने त्याची कामगिरी अधिक चांगली होते. प्लस मोडमध्ये इकोनॉमी मोडच्या तुलनेत एक्सॅव्हेटरची उत्पादनक्षमता २५ टक्के अधिक आहे. या यंत्रांच्या देखभालीचा खर्च १५ टक्के कमी असल्यामुळे ते गुंतवणुकीवर उत्तम मोबदला मिळवून देते. ४डीएक्स बाको लोडर दुसऱ्या बाजूला १२ टक्के अधिक इंधन-कार्यक्षम आहे आणि यात स्मूथ राइड सिस्टम (एसआरएस), आणि एक्सकॅव्हेटरवर एएमटी व सर्व्हो नियंत्रणे नियमानुसार आहेत.
नव्याने लाँच झालेल्या तीन व्हील्ड लोडिंग शॉव्हेल्सपैकी ४३३-४ जेसीबी इकोमॅक्स ट्रिपल फोर इंजिनने आणि झेडएफ अॅक्सल्स व ट्रान्समिशनने युक्त आहे. ८ टक्क्यांपर्यंत सुधारित निष्पत्ती व १० टक्क्यांपर्यंत वाढीव इंधन कार्यक्षमता यांमुळे नवीन यंत्राचा देखभाल खर्च कमी आहे, तसेच यातील केबिन १५ टक्के मोठे आहे.
याहून मोठे ४३७-४ जेसीबी 448 इको मॅक्स इंजिनने तसेच झेडएफ जर्मनी डब्ल्यूजी १३० ट्रान्समिशनने युक्त आहे. नवीन मॉडेल यापूर्वीच्या मॉडेलच्या तुलनेत १० टक्क्यांपर्यंत अधिक इंधन कार्यक्षम आहे. यातील केबिन मोठी असल्याने ऑपरेटरसाठी आरामदायी आहे. याच्या देखभालीचा खर्चही कमी आहे.
४५५-४ मध्ये कमिन्स इंजिन, झेडएफ जर्मनी अक्सेल्स आणि डब्ल्यूजी १९० ट्रान्समिशन आहे. पॉवर मोडवर ५ टक्क्यांपर्यंत अधिक निष्पत्ती व इंधन कार्यक्षमतेत १० टक्क्यांपर्यंत वाढ यांसह हे यंत्र सर्वाधिक कष्टप्रद कामे करण्याच्या दृष्टीने डिझाइन करण्यात आले आहे.
जेसीबीने नवीन व्हीएम११७ सॉइल कॉम्पॅक्टरही आणला आहे. हे यंत्र ५५ किलोबॅटच्या जेसीबी इकोमॅक्स ४४४ इंजिनने युक्त आहे. त्यामुळे इंजिनला वापरानंतर काही ट्रीटमेंट देण्याची गरज उरत नाही. हे यंत्र मागील मॉडेल्सच्या तुलनेत १० टक्क्यांपर्यंत अधिक इंधन-कार्यक्षम आहे. याची उत्पादनक्षमता, खात्रीशीरता आणि ऑपरेटवरचे नियंत्रण सगळेच उत्तम असल्याने कॉम्पॅक्शन गरजांसाठी हे सर्वांच्या पसंतीचे यंत्र आहे.
५३०-७० आणि ५३०-११० हे दोन नवीन, साइडला इंजिन असलेले, टेलीहॅण्डलर्स कंपनीने बाजारात आणले आहेत. दोन्ही यंत्रांमध्ये जेसीबी इकोमॅक्स ४४४ इंजिन आहेत. नियमित फोर-व्हील ड्राइव्हसोबत अधिक चांगल्या घर्षणासाठी अरुंद चेसिस देण्यात आली आहे. त्यामुळे ही यंत्रे साहित्य हाताळण्यासाठी अधिक अनुकूल झाली आहेत. याचे इंजिन बाजूला असल्याने ऑपरेटरला समोरचे अधिक चांगले दिसते व यंत्राच्या सुरक्षिततेत वाढ होते. कमी एनव्हीएच पातळी आणि वातानुकूलित केबिन यामुळे ऑपरेटरसाठी हे यंत्र आरामदायी झाले आहे.
जेसीबीचे डीलर नेटवर्क देशातील सर्वांत व्यापक नेटवर्क्सपैकी एक आहे. कंपनीचे ६० हून अधिक डीलर्स तर ७०० हून अधिक आउटलेट्स आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुट्या भागांच्या पुरेसा साठा आहे. यामुळे ग्राहकाला व्यावसायिक स्तरावरील उत्पादन सहाय्य मिळते आणि देशात कोठेही जेसीबी बांधकाम उपकरणे खरेदी केली तरी संपूर्ण मन:शांतीची हमी राहते.