रत्नागिरी, (आरकेजी) : जयगड ते डिंगणी हा बंदरजोड रेल्वे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यासाठी सुरु करण्यात आलेले सर्वेक्षण आज ग्रामस्थांनी उधळूण लावला. त्यामुळे हा प्रकल्प वादाच्या भोवर्यात सापडला आहे.
मुख्यमंत्र्यांनी मागील महिन्यात या प्रकल्पाचे भुमिपुजन केले होते. त्यानुसार रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी कोकण रेल्वेचे अधिकारी डिंगणी गावात आले. यावेळी खाडेवाडी, आगरवाडी आणि करंदेवाडी येथील ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला आक्षेप घेतला. हा रेल्वे मार्ग तीन वाड्यांच्या डोंगराजवळून जाणार आहे. त्यासाठी ड़ोंगर कापला गेलास भुस्खलन होण्याचा धोका आहे. त्यामुळे संतत्प ग्रामस्थांनी सर्वेक्षण रोखले.
या आधी कोकण रेल्वेच्या मुख्य ट्रँकसाठी या वाडीतल्या लोकांची जमीनी गेल्या आहेत. त्या बदल्यात प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्याही मिळालेल्या नाहीत. आता मागण्या पूर्ण होईपर्यंत सर्वेक्षण करू दिले जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्रामुळे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना माघार घेत परतावे लागले.