मुंबई, (निसार अली) : गोरेगाव जवाहर नगर रोड नंबर दहा येथील येथील रहदारीचा मुख्य रस्ता डांबरीकरणाच्या नावाखाली नावाखाली एक आठवड्यापासून खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या ठिकाणी अद्याप विकास कामे सुरु झालेली नाहीत. संबंधिताने रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी मनसेने केली आहे. अन्यथा कामास होत असलेल्या दिरंगाईबाबत ठेकेदारावर आणि संबंधीत अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शाखा अध्यक्ष अनंत सूद यांनी दिला आहे.