मुंबई (रुपेश दळवी) : जसलोक हॉस्पिटलचा ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा सन्मान केला. ६ ते १८ जुलै दरम्यान जसलोकमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
स्टाफसाठी हेल्थ चेकअप, पोस्टर पेंटिंग, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग, थीम पार्टी व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ६ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत जसलोकमधील प्रत्येक रूग्णाला काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्यांवर ४४ टक्के सूट दिली जाणार आहे. डॉ. सावतं यांच्या हस्ते यावेळी हॉस्पिटलमधील ३५ वर्षांपेक्षा जास्त सेवा केलेल्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. डॉक्टरांच्या अथक मेहनतीमुळे इथपर्यंत पोहोचलो आहोत, तसेच हॉस्पिटलमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करत आम्ही रूग्णांची सेवा करत आहोत असे यावेळी जसलोक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्या सीईओ डॉ. तरंग यांनी म्हटले.