सातारा : दि ३-४-५ जून २०२२ दरम्यान साताऱ्यातील वेद भवन मंगल कार्यालयात जनवादी महिला संघटनेचे १२ वे राज्य अधिवेशन अत्यंत उत्साहात संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय उपाध्यक्ष सुधा सुंदररमन यांनी केले. संघटनेच्या सल्लागार माजी खासदार वृंदा करात यांनी उद्घाटन सत्रात मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. अशोक भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्वागत समितीनच्या नियोजनाने हे अधिवेशन पार पाडले.
गेल्या तीन वर्षांत राज्य, जिल्हा, तालुका, गाव पातळीवर संघटनेने केलेल्या कामाचा अहवाल प्रतिनिधींनी मांडला. १८ जिल्ह्यांतून एकूण २७८ प्रतिनिधी या अधिवेशनात उपस्थित होते.महिलांना भेडसावणाऱ्या रेशन, रोजगार, महागाई, शिक्षण, आरोग्य, महिलांवरील वाढते अत्याचार या विषयांवर आणि मोदी सरकारच्या जनता, विशेषतः महिला विरोधी धोरणांवर टीका करणारे अनेक ठराव या अधिवेशनाने एकमताने मंजूर केले.
संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे यांच्या मार्गदर्शनाने या अधिवेशनची यशस्वी सांगता झाली. यावेळी पुढील तीन वर्षांसाठी ५३ महिलांची राज्य कमिटीची निवड करण्याण आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
• राज्य अध्यक्ष : नसीमा शेख
• खजिनदार : सुभद्रा खिल्लारे
• सरचिटणीस : प्राची हातिवलेकर
• उपाध्यक्ष : सोन्या गिल, हेमलता पाटील, ताई बेंदर, शेवंता देशमुख, हिराबाई घोंगे, रेहाना शेख, मुमताज हैदर, प्रतीक्षा हाडके, सुनंदा तिडके
• सहसचिव : लहानी दौडा, सुनिता शिंगडा, सुरेखा जाधव, शकुंतला पाणीभाते, रेखा देशपांडे, आनंदी अवघडे, दुर्गा काकडे, प्रीती शेखर
• राज्य कमिटी सदस्य : सविता डावरे, मेरी रावते, निकिता काकरा, गिरजी कानल, सुनंदा बलला, लिंगव्वा सोलापुरे, गीता वासम, अरिफा शेख, संगीता सोनावणे, सुगंधी फ्रांसिस, अंजु दिवे, प्रमिला मांजलकर, रेखा कांबळे, खातून सय्यद, अपर्णा दराडे, नंदा जगताप, दिलशाद टिनमेकर, उषा म्हात्रे, सविता पाटील, कांताबाई प्रधान, निर्मला चौधरी, सुवर्णा गांगुरडे, चंद्रकला मगदुम, मंगला जुनघरे, अंजली धारगावे, शशिकला बुधावले, चंदा वानखेडे, पद्मा गजभिये, विद्या निब्रड, मंगला जुनघरे, शुभा शमीम, आरमायटी इराणी.