मुंबई, ( निसार अली) : जनवादी हॉकर्स युनियन या फेरीवाल्यांच्या युनियनची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी गोरेगाव पश्चिमेतील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये झाली. या वेळी पालघर, ठाणे व मुंबईतील अनेक भागातील 122 सदस्यांनी सहभाग घेतला. सर्वानुमते कॉम्रेड महेंद्र सिंह यांना अध्यक्ष तर के .नारायणन यांना कार्याध्यक्ष तर डॉ. रवी मदने यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आलं. 27 सदस्यांची समितीवर नियुक्ती झाली. संस्थापकीय सेक्रेटरी कॉम्रेड. बी. बालन यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संघटना वाढीसाठी व फेरीवाल्यांचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल अस मत नवीन समितीने व्यक्त केले.