रत्नागिरी : सरकारी अधिकार्यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याला कसे प्राधान्य दिले पाहिजे, याचे धडे या अधिकार्यांना पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज दिले. अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयात आलेल्या जनतेच्या समस्या समजून घेऊन, त्या प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले. जामगे (ता.खेड) येथे विविध शासकीय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
आपण जनतेचे सेवक असून जनतेच्या विविध प्रकारच्या सरकारी समस्या सोडविताना अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषदेतील विविध विभाग, नळपाणी पुरवठा विभागांचा आढावा त्यांनी घेतला.