रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित महानाट्य ‘जाणता राजा’ 14 ते 16 मार्च चिपळूण येथील स्वा. वि. दा. सावरकर मैदान येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गुरुवारी याचा उद्घाटन सोहळा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
चिपळूण येथील स्वा. वि. दा. सावरकर मैदान, बहादूर शेख नाका येथे हे महानाट्य सायंकाळी 6 वाजता तीनही दिवशी मोफत होणार आहे. पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते गरुवारी उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला खासदार विनायक राऊत, खासदार सुनिल तटकरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम उपस्थित राहणार आहेत. या महानाट्याचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.