मुंबई : जनता केंद्र या पुरोगामी विचारांच्या सामाजिक संस्थेचा 70 वा वर्धापन दिवस 11 जानेवारी 2025 रोजी जनता केंद्र ताडदेव येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लेखक व सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश सावंत यांनी उपस्थितांना संबोधित करताना गांधी आंबेडकर वैचारिक संबंधाचा आढावा घेतला.
दुसरे प्रमुख वक्ते अर्थतज्ञ् श्री विश्वास उटगी यांनी साने गुरुजींचा जीवनपट उपस्थितांना उलगडून दाखविला.
याप्रसंगी शाहीर शिवराम सुकी व त्यांचे सहकारी दिक्षा, भूमी व समर यांनी चळवळीतील गाणी सादर केली. कार्यक्रमात जनता केंद्रात अनेक वर्ष सेवा प्रदान करून निवृत्त झालेले कर्मचारी व कार्यकर्ते जयाताई तावडे, अनंत राणे,नरसुमामा, विमलताई पवार, सुनीता कदम, धनश्री राणे, सावंत मॅडम यांचा कार्यकारी विश्वस्त रामचंद्र साईल, विश्वस्त ऋतुराज तावडे, निलेश मांजवकर व ऍड प्रिती बने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संस्थेचे हितचिंतक व मुंबई विभाग ग्रंथालय संघांचे अध्यक्ष श्री दिलीप कोरे यांची कोकण विभाग ग्रंथालय संघाच्या अध्यक्ष पदी निवड झाली त्याबद्दल जनता केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विश्वनाथ मलुष्टे यांनी अध्यक्षीय भाषणात जनता केंद्राच्या सामाजिक क्षेत्रातील योगदाना विषयी माहिती दिली.
या प्रसंगी अपना बाजारचे उपाध्यक्ष श्री श्रीपाद फाटक, Municipal युनियनचे नेते श्री रमाकांत बने, जनता दल सेक्युलर मुंबईचे अध्यक्ष श्री प्रभाकर नारकर, मूलभूत अधिकाऱ संघर्ष समिती (मास) उपाध्यक्ष डॉ यु. व्ही. महाडकर, अपना बाजारच्या भारती शिरसाठ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीलकर, हर्षदा राणे,TDF चे अध्यक्ष प्रा. जनार्दन जंगले, मासचे डॉ आनंद कासले, TDF चे शंकर मोरे, मूलभूत अधिकाऱ संघर्ष समिती (मास) च्या कार्यकर्त्यां ललिता सोनावणे, अपना बाजारचे श्री मिलिंद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन जनता केंद्राचे विश्वस्त श्री दिनेश राणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ मलुष्टे, कार्यकारी विश्वस्त श्री रामचंद्र साईल, विश्वस्त ऋतूराज तावडे, ऍड प्रिती बने, निलेश मांजवकर व दिनेश राणे तसेच संस्थेच्या कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.