मुंबई : युवा जनता दलातर्फे मुंबईत चारकोप येथे रविवारी घरकाम करणाऱ्या महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. साधारण ५० महिलांची उपस्थिती अपेक्षित असताना सव्वाशेहून अधिक महिला सभेला हजर होत्या. जनता दल प्रणित जनता घरेलु कामगार संघटनेच्या माध्यमातून घरकाम करणाऱ्या महिलांना संघटित करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. आठ दिवसांच्या प्रयत्नानी आजची सभा यशस्वी झाली. किंबहुना सभा संपल्यावरही महिला येत होत्या. यावेळी
प्रमुख वक्ते म्हणून जगदीश पाटणकर, युवा संस्थेचे अमित गवळी, जनता दल सेक्युलर मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, जनता दल सेक्युलर मुंबई महासचिव अपर्णा दळवी, युवा जनता दल सेक्युलर मुंबईचे अध्यक्ष आणि बेरोजगार युवा समितीचे केतन कदम, तसेच बेरोजगार युवा समितीचे सचिव ॲड. प्रशांत जाधव, उत्तर मुंबई जिल्हा संघटक सुधीर यादव, जनता घरेलू कामगार संघटनेच्या सांची कदम, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष (युवा जनता दल) किरण बागुल, चारकोप तालुका अध्यक्ष ॲड. आदित्य साळवे तसेच निशांत जाधव, राहुल प्रधान आणि सुरेंद्र मनोहर उपस्थित होते.