मुंबई : भांडुप जिंकायचे या इर्षेने आणि जिद्दीने कामाला लागलेल्या ईशान्य मुंबई जिल्हा जनता दलाने या दिशेने अाणखी एक पाऊल पुढे टाकत वाॅर्ड क्रमांक ११० मधील भांडुप सोनापूर या मुस्लिम बहुल भागात नवे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कुलगुरूकृपा सोसायटी, टिळक नगर, सोनापूर, भांडुप पश्चिम, मुंबई ४०० ०७८ येथील गाळा क्रमांक ५ मध्ये हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे.
अलिकडेच जनता दलातर्फे भांडुप, सोनापूर या गलिच्छ वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली होती. शेकडो कार्यकर्ते यावेळी रस्त्यावर उतरले होते. दिवाळी निमित्ताने आयोजित स्नेहमिलन मेळाव्यासही या भागातून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
त्यातूनच या भागातील नागरी प्रश्न सोडविण्यासाठी जनता दलाने या भागात कार्यालय सुरू करावे, अशी मागणी पक्षाच्या नवोदित कार्यकर्त्यांसोबतच स्थानिक जनतेकडून करण्यात येत होती. त्याला प्रतिसाद म्हणून ईशान्य मुंबई जनता दलाचे अध्यक्ष संजीवकुमार सदानंद, शुभम पवार, जमील भाई, अकबर भाई आधीच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू करण्यात येत आहे. भांडुप पश्चिम भागातील पक्षाचे हे तिसरे कार्यालय आहे.
येत्या रविवारी २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता या कार्यालयाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. जनता दलाच्या मुंबईतील सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहून ईशान्य मुंबई जनता दलाच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे, ही विनंती!
प्रभाकर नारकर संजीवकुमार सदानंद सलीम भाटी
शुभम पवार जमील भाई अकबर भाई प्रवीण क्रॅस्टो प्रिया संजीवकुमार, अक्षय मांजरेजर, सचिन गायकवाड,असिफ अन्सारी, सिद्धू चाचा,गणेश चोपडेकर, ऋषी शर्मा, अविनाश सूर्यवंशी, संतोष गायकवाड, हितेश कदम, प्रवीण शेट्टी, अक्षय शेट्टी, गुरु शेट्टी, मोनीश कावळे, सचिन राणे, अनिकेत पेडणेकर, ईश्वर पुजारी.