मुंबई, (निसार अली) : ईशान्य मुंबईत पक्षाचे स्थान बळकट व्हावे, जसंपर्क वाढावा, पक्षाची ध्येयधोरणे यांचा प्रसार व्हावा या उद्देशाने जनता दल(सेक्युलर) ने भांडुप येथे कार्यालय सुरू केले आहे. पक्षाचे ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष संजीवकुमार सदानंदन यांच्या गावदेवी रोड, भांडुप पश्चिम येथील पक्ष कार्यालयाचे ज्येष्ठ समाजवादी नेते जी. जी. पारिख यांनी उद्घाटन केले. यावेळी पक्षाचे प्रदेश प्रधान महासचिव प्रताप होगाडे, उपाध्यक्ष सुहास बने, प्रेमचंद पांडे, मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलिम भाटी, प्रशांत गावंड किशोर कर्डक, तसेच चंद्रा श्रीनिवासन, अपर्णा दळवी, डॉ. मारिया, ज्ञानेश्वर उके, भगवान जंगम आदी उपस्थित होते