मुंबई, (निसार अली) : जनकल्याण सहकारी बँक लिमिटेडच्या मालवणी शाखेच्या वतीने महिनाभरापासून मालवणीतील जनकल्याण नगर परिसरात व ग्राहकांना कापडी पिशव्यांचा वाटप करत आहे. पिशवी वाटपाचा उद्देश नागरिकांना प्लास्टिकचा वापर बंद करून पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करणे, सरकारच्या प्लास्टिक बंद धोरणाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवणे व प्लास्टिकविरोधात उत्साह वाढवणे असा आहे. अध्यक्ष संतोष केळकर, संचालिका माया भाटकर, शाखाधिकारी गिरीश दामले, संजय गोरेगावकर, सहशाखाधिकारी जयश्री पेडणेकर, कर्मचारी वर्ग, ग्राहक आणि परिसरातील रहिवासी यावेळी उपस्थित होते.