मुंबई : भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मिळालेले अभुतपूर्व यश पाहता विश्वास व परिवर्तनाला जनतेची साथ आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपाला ८२ जागांवर विजय मिळाला, याबद्द्ल आनंद व्यक्त करत त्यांनी राज्यातील नागरिकांचे आभार मानले.
या आधी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला इतके मोठे यश मिळवता आलेले नाही. भाजपाने १९५ जागांवर मुंबईत निवडणूक लढवली. त्यांपैकी ८१ जागा मिळाल्या. २० जागांवर तर कमी फरकाने भाजपा उमेदवारांचा पराभव झाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या निवडणुकीत पारदर्शकतेल्ला कौल मिळाला आहे, हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पारदर्शकतेच्या धोरणाला राज्यातील नागरिकांची साथ लाभली, असेही त्यांनी सांगितले.