मालाड, ता.१२ (वार्ताहर) : मालवणीत रक्तदान शिबिराचे आयोजन जमाते इस्लामी हिंद च्या वतीने दिनांक ११ जुलै रोजी करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय रक्तपेढीचे सहकार्य त्यासाठी घेण्यात आले.
कोरोनाच्या महामारी च्या काळात रक्ताचा तुटवडा असल्याने जमाते इस्लामी हिंदच्या युथ विंग ने पुढाकार घेत रक्तदान शिबिर घेतले. मालवणीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ८३ बाटल्या रक्त गोळा करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात जमाते इस्लामी हिंदने अनेकदा मुंबईतील विविध भागात रक्तदान शिबिराचे घेऊन शेकडो रक्त पिशव्या संकलन करून रक्तपेढीला दिले आहे.















