
रत्नागिरी, (आरकेजी) : जिल्ह्यात उघडकीस आलेल्या जलयुक्त शिवार भष्ट्राचारप्रकरणी चार अधिकार्यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. खेड, दापोली आणि मंडणगड येथे हा भ्रष्टाचार घडला आहे.
पालकमंत्र्यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. समितीने खेड तालुका कृषी अधिकाऱ्यांसह चौघांच्या निलंबनाची शिफारस केली आहे.
प्राथमिक अहवालात खेड तालुक्यातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषी अधिकारी आणि खेड तालुका कृषी अधिकाऱ्यांना निलंबनाची शिफारस करण्यात आली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे.
भष्ट्राचाराचे आरोप होत असलेल्या दापोली उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशीची शिफारस कृषी सहसंचालकांकडे करण्यात आली आहे.
या अधिकार्यांचे होणार निलंबन
कृषी सहाय्यक- कळंबणी विभाग—- पांडुरंग दुबळे
कृषी पर्यवेक्षक- खवटी विभाग—— प्रकाश गोरीवले
मंडळ कृषी अधिकारी खेड- गुलाबसिंग वसावे
तालुका कृषी अधिकारी खेड- सुरेश कांबळे