रत्नागिरी, (आरकेजी) : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात २० ऑगस्टला होणाऱ्या जेलभरो आंदोलनात शिवसेनाही सहभागी होणार आहे. सिंधुदुर्ग- रत्नगिरी लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी सेनेच्या सहभागाबाबत माहिती दिली आहे.
काही दिवस शांत असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलन पुन्हा पेटणार आहे. जनहक्क सेवा समितीने २० ऑगस्टला जेलभरो आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेनेही या आंदोलनाला साथ दिली आहे. संपूर्ण ताकदनिशी शिवसेना या आंदोलनात उतरेल, असे खासदार विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
स्थानिकांचा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आहे. शिवसेनेचा पाहिल्यापासून या प्रकल्पाच्या विरोधात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विनाशकारी प्रकल्प या ठिकाणी होऊ नये, अशीच आमची भूमिका आहे. त्यामुळेच २० तारखेच्या आंदोलनामध्ये शिवसेना सक्रियपणे सहभागी घेईल, या बाबत आमदार राजन साळवी यांच्याशी चर्चा करणार असल्याचही राऊत म्हणाले