रत्नागिरी, (आरकेजी) : जैतापूर अणु उर्जा प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. फ्रान्सहून आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाला सन २०१८ ला प्रकल्पाचे काम सुरु करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या विधानामुळे जैतापूरमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी कुठल्याही सालात काम सुरु करा; एक वीट सरकारला रचू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी आलेली यंत्रसामुग्री परत पाठवण्यात येईल, असेही साळवी म्हणाले आहेत.
येथील ग्रामस्थ या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. तेव्हा जनआंदोलनाच्या रेट्यावर हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच साळवींनी दिला आहे.