रत्नागिरी, (आरकेजी) : गेले काही महिने शांत असलेले जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाविरोधातील वातावरण पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत. जनहक्क सेवा समितीने जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता साखरीनाटे येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला होणार्या विरोधाचा मुद्दा गेली काही वर्षे गाजत आहे. प्रकल्पाविरोधात अनेक वेळा तीव्र स्वरुपाची आंदोलने केली गेली आहेत. शिवसेनेनेही स्थानिकांच्या सोबत राहू प्रकल्पाला विरोध केला आहे.
कोणत्याही परीस्थितीमध्ये हा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका जनहक्क सेवा समितीने घेतली आहे. त्यासाठी साखरीनाटे येथे जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.