रत्नागिरी : जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. सकाळी डॉ चंद्रशेखर निमकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, प्रशांत जुवेकर, दिवाकर निमकर, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, खासदार विनायक राऊत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचा उद्घाटन सोहळा झाला. दोन दिवस ही परिषद चालणार आहे.
रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रीडासंकुल अर्थात कै. आर. सी. काळे नगरीमध्ये या परिषदेला सुरुवात झाली आहे. 111 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाच्या विद्यार्थी सहाय्यक संस्थेने देवरूखे समाजातील बांधवांचा एकमेकांशी परस्पर परिचय, विचारांचे आदान-प्रदान, विद्यार्थी सहाय्यक संस्थेसाठी निधी संकलन तसेच काही ठिकाणी विद्यार्थी वसतिगृह उभारणे, विद्यार्थ्यांची सकारात्मक दृष्टीने कार्यक्षमता वाढविणे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यावसायीक कल वाढविणे आदी उद्दिष्टे ठेवून ही परिषद आयोजित केली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी परिसंवाद, स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनचरित्र- शरद पोंक्षे, उत्तुंग भरारी- देवरुखे ज्ञाती कलाकार व यशस्वी उद्योजक मुलाखत व सत्कार आदी कार्यक्रम पहिल्या दिवशी पार पडले..
संमेलन यशस्वी करण्यासाठी सतीश शेवडे, उमेश कुळकर्णी, राजू भाटलेकर, मुकुंद जोशी, उल्हास मुळे, अवधूत मुळे, अविनाश कुळकर्णी, आदींसह अनेक कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.